
देवरुख दि. २७ सप्टेंबर :- देवरुख येथील प्रतियश शेतकरी मदन मोडक व शेती तज्ञ हेमंत तांबे यांच्या हस्ते संकल्पनेतून संगमेश्वर तालुक्यातील सांदिपनी गुरूकुल संस्था कुडवली येथील जागेत६२०० वृक्षांची जंगल निर्मिती करण्यात आली होती त्याचा संकल्पसिध्दी समारोह सांदिपनी गुरुकुल, कुडवली संस्थेचे ट्रस्टी महेश आरस व सौ. सुनिता महेश आरस यांचेसह मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून करणेत आला.
यावेळी वृक्षप्रेमी व दानशूर व्यक्ती मदन मोडक, सौ. मोडक, शेती तज्ञ हेमंत तांबे, युयुत्सू आर्ते, ज्येष्ठ पत्रकार सुरेश सप्रे, देवरूख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदानंद भागवत, नगरसेवक रूपेश भागवत, शामकांत अळवणी आदी मान्यवर उपस्थित होते.
मदन मोडक यांनी संकल्पनेची माहिती देताना सांगितले की की आपल्या परिसरामध्ये एकूणच आपल्या जिल्हात प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते ,बेसुमार झाड तोडली जातात यामुळे आपल्या भोवतालचे सगळे डोंगर हे पूर्णपणे उघडे बोडके होत आहेत, त्याचा हवामानावर पावसावर वाईट परिणाम होतो असतो. या बाबत आपण काय करू शकतो काय करूया ? .
प्रत्यक्ष आपण ती वृक्ष तोड थांबवू शकत नाही जेथे शेतकरी जागेचे मालक आपणहुन पैशाच्या लालसेने झाडे तोडतात. यावर उपाय म्हणून आपण जास्तीत जास्त नवीन रोप लावायची नवीन वृक्ष लावायचे आणि हे एक व्रत म्हणून स्वीकारायचं.या उद्देशाने दरवर्षी जमतील तेवढी झाड लावत राहायची.असा संकल्प मदन मोडक व हेमंत तांबे यांनी केला पण प्रत्यक्षात लागवडी करता जागा मिळेना जी जागा मिळाली ती खूपच खूप डोंगर उतार असलेली आणि वृक्ष लागवड होणार नाही अशी. या मुळे आपला संकल्प पुरा होईल की नाही हे या विवंचनेत असताना शेती तज्ञ हेमंत तांबे व आम्ही सांदीपनी गुरुकुल संस्थेशी संपर्क करू त्यांच्याशी बोलणं झालं, माझ्या मनातली योजना त्यांना सांगितलेवर त्यानी परवानगी दिली. व आम्ही मार्च पासून सदर वृक्ष लागवडीसाठीचे काम सुरू केले. व जूनपर्यंत ६२००झाडे लागवड पुर्ण केली त्यांचं देखील सामाजिक कार्य असल्यामुळे त्यांनी आमच्या योजनेला संमती दिली. कुडवली मध्ये त्याची जागा आहे त्यातली 20 ते 25 एकर जागेवर नवीन वृक्ष लागवड करायला परवानगी दिली.व ती लागवड पुर्ण झाली
हेमंत तांबे हे गेली चार ते पाच वर्ष समाजाकरता व शेतकऱ्यांकरिता कोकणात होणारी फळ झाड, आणि जंगल निर्मितीला आवश्यक असलेली अशी अनेक झाडं विनामूल्य लोकांना देतायेत आणि ती संख्या थोडी थोडकी नाही तर दरवर्षी सुमारे 50 हजार झाडं ते स्वतःच्या खर्चाने तयार करून ती वाढवून लोकांना दान म्हणून देत आहेत की जेणेकरून आसपासच्या शेतकऱ्यांनी संस्थांनी ग्रामपंचायत यांनी या झाडाची लागवड करावी. ह्या वृक्ष लागवड संकल्प करता लागतील तेवढी झाड मी तुम्हाला पूर्णपणे फुकट दिली, या संकल्पात ते माझ्या बरोबरीने राबले.मी यंदाच्या वर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात वृक्ष लागवडीला सुरुवात करायचं ठरवलं. खड्डे मारायला झाडं लावायला कामगार मिळणं फार कठीण आणी खर्चिक झालं. बियान पासून रोपं तयार करणं ती वाढवण, खड्डे मारून ती लागवड करणं यात आम्हाला दोघांना मिळून सुमारे सहा लाख रुपये खर्च आला.
आमचा संकल्प किमान यावर्षी ५००० झाड लावायची असा पण आम्ही दोघांनी मिळून सहा हजार दोनशे झाडांची लागवड केली.ही झाडं प्रामुख्याने कोकणात होणारी फळझाड आहेत जसं की रायवळ आंबा जांभूळ कोकम फणस बकुळ आणि इतर झाड जंगलामध्ये होणारे जसं वड, पिंपळ, बहावा शिवण इ दहा ते बारा प्रकारची झाडं आम्ही तिथे लावली आणि ही झाडे लावत असताना सांदीपनी गुरुकुलच्या आवारात किंवा डोंगरात जी जुनं झाड होती त्या जुन्या झाडाला अजिबात धक्का न लावता त्या झाडांना न तोडता उरलेल्या जागेमध्ये आम्ही झाडे लावली असल्याचे मोडक यांनी सांगितले शेवटी सांगितले



