रत्नागिरी

युनायटेड गुरुकुल मधील विद्यार्थ्यांची ७५ वर्षाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पा चरणी संगीत सेवा!

संगमेश्वर दि. २६ सप्टेंबर ( प्रतिनिधी ):- परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल चा स्वतंत्र विभाग असलेले पंचकोश आधारित गुरुकुल मधील विद्यार्थ्यांनी चिपळूण मधील ७५ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या गणपती बाप्पा चरणी आपली संगीत सेवा २४ सप्टेंबर २०२६ रोजी रुजू केली.

या सामूहिक संगीत सेवेमध्ये गणपतीच्या श्लोक सादरीकरणानंतर गजानना श्री गणराया तूच सुखकर्ता विठुचा गजर हरिनामाचा अशी गणपती बाप्पाची गाणी मुलानी उत्तम सादर केले त्यानंतर गीत रामायणातील ‘ नकोस नको परत फिरू ‘ हे गाणे सादर केले ‘ उधळीत शतकीरणा ‘ या उत्साह वाढवणाऱ्या गीता सोबत अनुक्रमे म्यानातून उसळे तलवारीची पात, अरुणोदय झाला जयोस्तुते अशी स्फूर्ती गीतांची मालिका विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे सादर केली गुरुकुल मध्येच चाल लावलेला बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा मुलांनी भावपूर्ण सादर केला आणि कार्यक्रमाची सांगता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ने मजसी ने परत मातृभूमीला या गीताने झाली.

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी भैरवी आणि गजर म्हणून कार्यक्रमाचा समारोप संवादिनी साथ करत गुरुकुल विभागातील कलाशिक्षक आणि संगीत मार्गदर्शक पराग लघाटे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुकुलातील अध्यापिका सौ प्राची भावे मॅडम यांनी केले.

कार्यक्रमासाठी गुरुकुलचे माजी विद्यार्थी मेघ देवळेकर , श्रीश तांबे, संकल्प तांबे यांनी अनुक्रमे पखवाज तबला आणि तालवाद्य अशी साथ केली. सर्व विद्यार्थ्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या संध्याकाळच्या आरती मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.

संस्थेच्या कै.आप्पासाहेब दांडेकर संगीत विभागा अंतर्गत होणाऱ्या प्रशिक्षण माध्यमातून चिपळूण मधील युवा कलाकार प्रथमेश देवधर आणि वरद केळकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी लाभले. या कार्यक्रमासाठी प्रभंजन पिंपुटकर आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमासाठी गुरुकुल शाळा समिती अध्यक्ष सौ.सारिका भावे आणि प्रशालेचे मुख्याध्यापक संजय बनसोडे सर, गुरुकुल विभाग प्रमुख मंगेश मोरे सर आणि सर्व गुरुकुल अध्यापक उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button