महाराष्ट्ररत्नागिरी

राज्यातील २६५ तालुक्यांतील दुष्काळग्रस्त भागासाठी शासनाकडून विशेष बाब म्हणून उपाययोजना व सवलती लागू

मुंबई दि. २६ सप्टेंबर :- राज्यातील दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील दुष्काळग्रस्त भागासाठी राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते आज पर्यंत या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य घटकांनी प्रभावित झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे आयुक्त, कृषी यांच्या अहवालावरून दिसून येते. सदर २६५ तालुक्यांमध्ये Trigger-१ (प्रथम कळ) लागू असल्यामुळे तिथे पंचनामे करण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी यांनी तात्काळ सुरु करावी. सर्व्हेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शवणारे छायाचित्र व जीपीएस कोऑडीनेट संकलन करून पिक परिस्थितीचा अहवाल आयुक्त, कृषी यांच्या मार्फत शासनास तात्काळ सादर करण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

त्यानुसार राज्यातील दुष्काळग्रस्त Trigger-१ (पहिली कळ) २६५ तालुक्यांत लागू असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे परिशिष्ट-१ मध्ये नमूद एकूण २६५ तालुक्यांतील दुष्काळग्रस्त भागासाठी राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून खालील उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

1. जमीन सूट

2. पिक कर्जाचे पुनर्गठन

5. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती

6. कृषी पंपाच्या चालू विजबिलात सूट (७.५ हॉर्सपावर पर्यंत क्षमतेच्या विजपंपाचे वीज बिल अगोदरच माफ करण्यात आले आहे. त्यावरील वीज पंपांना सदर सूट लागू असेल)

7. शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी

8. रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरु करणे

9. आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर

10. टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे

11. शेतीवर आश्रित शेतकरी/मजूर इत्यादी यांना अन्न धान्याची टंचाई होणार नाही याबाबत व्यवस्था उभी करणे

12. जनावरांना आवश्यक चारा उपलब्ध होईल याची व्यवस्था करणे

13. जलसंधारणाची कामे सुरु करणे

14. अगोदरच निर्गमित करण्यात आलेले शासन निर्देशाप्रमाणे पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याचे नियोजन करणे

सदर २६५ तालुक्यांमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेत पिकांच्या नुकसानीबाबतची मदत विहीत कार्यपध्दतीची पूर्तता करुन स्वतंत्र शासन निर्णयान्वये जाहीर केली जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button