रत्नागिरी

राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने आपल्या ग्राहक, व्यापाऱ्यांसाठी केली स्वतःची क्यूआर कोड सेवा कार्यान्वित

बँकेचे अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार यांनी दिली माहिती

राजापूर दि. २६ सप्टेंबर : आधुनिक बँकिंग सेवांच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने आपल्या ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठी स्वतःची क्यूआर कोड सेवा कार्यान्वित केली आहे. या सेवेचा अधिकृत शुभारंभ लवकरच आमदार किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार यांनी दिली.

राजापूर अर्बन बँक आपल्या ग्राहकांना आधुनिक आणि डिजिटल बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. बँकेने यापूर्वीच ग्राहकांसाठी मोबाईल ऍपसह विविध आधुनिक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात आता स्वतःच्या क्यूआर कोड सेवेची भर पडली आहे.

बँकेच्या राजापूर शहरातील शाखेसह विविध शाखा ज्या भागात कार्यरत आहेत, त्या परिसरातील अनेक छोटे-मोठे व्यापारी बँकेचे ठेवीदार तसेच कर्जदार आहेत. त्यामुळे नव्या क्यूआर कोड सेवेचा मोठ्या संख्येने व्यापारी आणि ग्राहकांना फायदा होणार आहे. विशेषतः छोट्या व्यावसायिकांसाठी डिजिटल पद्धतीने व्यवहार करणे अधिक सुलभ होण्यास या सेवेची मदत होणार आहे.

डिजिटल व्यवहारांना वाढता प्रतिसाद मिळत असताना स्थानिक सहकारी बँकेने स्वतःची क्यूआर कोड सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे ग्राहकांना अधिक सुलभ, आधुनिक आणि सुविधाजनक बँकिंग पर्याय उपलब्ध होणार आहेत.

या नव्या सेवेचा औपचारिक शुभारंभ लवकरच आमदार किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे ॲड. शशिकांत सुतार यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button