क्रीडारत्नागिरी

जिल्हास्तरीय तायक्वॉंदो स्पर्धेत कु. प्रद्युम्न प्रथमेश दाभोळे याची सुवर्ण कामगिरी

दापोली दि. १३ जुलै :- रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने आणि संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमी व नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लब आयोजित तायक्वॉंदो स्पर्धा १० ते १२ जुलै २०२६ ओमेगा गार्डन हॉल, देवरुख येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये सिध्दाई तायक्वाँडो स्पोर्ट्स अँन्ड फिटनेस अकॅडमी, दापोलीचा खेळाडू कु. प्रद्युम्न प्रथमेश दाभोळे याने सुवर्णपदक संपादन केले. त्याची राज्य स्पर्धे करिता निवड झाली आहे.

प्रद्युम्नला दापोली तालुका महिला प्रमुख प्रशिक्षिका सौ. प्रिती दाभोळे व दापोली तालुका प्रमुख प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय तायक्वॉंडो खेळाडू श्री. प्रथमेश दाभोळे यांचे मार्गदर्शन लाभले.

पदक विजेता प्रद्युम्न व प्रशिक्षक यांचे भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. केदार साठे, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष तसेच जालगाव पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते, आणि भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. जया साळवी, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ. वैष्णवी वेल्हाळ, तालुका सरचिटणीस श्री संदीप केळकर,शहर सरचिटणीस श्री मयुरेश्वर वेल्हाळ, जिल्हा सरचिटणीस किसान मोर्चा श्री धीरज पटेल ज्येष्ठ कार्यकर्ता श्री अजय साळवी, तायक्वांदो राज्य संघटना खजिनदार व जिल्हा संघटना अध्यक्ष श्री. व्यंकटेश्वरराव कररा, जिल्हा संघटना सचिव श्री. लक्ष्मणराव कररा, श्री. प्रदिप दाभोळे,श्री. विष्णू गोडसे, तसेच सिध्दाई तायक्वाँडो स्पोर्ट्स अँन्ड फिटनेस अकॅडमी, दापोली उपाध्यक्ष श्री. प्रदिप राजपूत, सहसचिव श्री. महेश्वर जाधव, कोषाध्यक्षा सौ. श्रध्दा दाभोळे, सदस्य श्री. शैलेश मिसाळ व श्री. मंगेश गोडसे आणि समस्त पालक वर्ग यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button