रत्नागिरी
जिल्हास्तरीय लोकशाही दिन ५ ऑक्टोबर रोजी

रत्नागिरी, दि. २३ सप्टेंबर : माहे ऑक्टोबर 2026 चा लोकशाही दिन सोमवार 5 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी १ ते २ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात होणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. लोकशाही दिनाकरीता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरिकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात. लोकशाही दिनाकरीता अर्जदाराने अर्ज विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतीत पाठविणे आवश्यक आहे.

