रत्नागिरी

चिपळुणात २४ सप्टेंबरला ‘श्री गणेशा कला आणि संस्कृतीचा’ सोहळा

गणेशोत्सव राज्य महोत्सवांतर्गत आयोजन

रत्नागिरी, दि. २३ सप्टेंबर :-  पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या ८ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या, अनुषंगाने सांस्कृतिक समृद्धी आणि लोककलांचा संगम घडवणारा ‘श्री गणेशा… कला आणि संस्कृतीचा’ हा विशेष कार्यक्रम २४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्याला राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत, महसूल राज्यमंत्री योगेश कदम आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

तसेच, या कार्यक्रमास खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रमोद जठार, अनिकेत तटकरे आणि विधानसभा सदस्य भास्कर जाधव, शेखर निकम, किरण सामंत यांच्यासह चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे व पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आदी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या शानदार सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button