महाराष्ट्रराजकीय

महाराष्ट्रसह चार राज्यांच्या विधान परिषद निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली दि. २२ सप्टेंबर :- भारत निर्वाचन आयोगाने महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुकांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. या चार राज्यांमधील विविध मतदारसंघांतील विद्यमान सदस्यांची मुदत संपत असल्यामुळे या निवडणुका घेण्यात येत आहेत.

महाराष्ट्रातील रिक्त होणाऱ्या जागा

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या एकूण ५ जागांसाठी (३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघ) ही निवडणूक होणार आहे.

▪️औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ

▪️ पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ (अरुण गणपती लाड)

▪️नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ (अभिजित गोविंदराव वंजारी)

▪️अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ (सरनाईक किरण रामराव)

▪️ पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ (जयंत दिनकर आसगावकर)

निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक

निवडणूक आयोगाच्या धोरणानुसार खालीलप्रमाणे टप्पे पार पडतील:

▪️अधिसूचना जारी करण्याची तारीख: २९ सप्टेंबर २०२६ (मंगळवार)

▪️ अर्ज करण्याची शेवटची तारीख: ६ ऑक्टोबर २०२६ (मंगळवार)

▪️अर्जांची छाननी: ७ ऑक्टोबर २०२६ (बुधवार)

▪️उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: ९ ऑक्टोबर २०२६ (शुक्रवार)

▪️ मतदानाची तारीख: २३ ऑक्टोबर २०२६ (शुक्रवार)

▪️ मतदानाची वेळ: सकाळी ८:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत

▪️मतमोजणी: २७ ऑक्टोबर २०२६ (मंगळवार)

▪️ निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची अंतिम तारीख: ३१ ऑक्टोबर २०२६ (शनिवार).

आचारसंहिता लागू

संबंधित मतदारसंघांमध्ये आजपासूनच आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेची सविस्तर माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button