स्वरूप अर्थ कुटुंब ५० हजार सभासदांचे झाले – ॲड.दीपक पटवर्धन

रत्नागिरी दि. २१ सप्टेंबर :- स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या स्थापनेवेळी उणे पुरे 300 सभासद होते. तालुका कार्यक्षेत्र होते. दहा हजारांचे भाग भांडवल होते. पण आज ३५ वर्षात पतसंस्थेने आपली प्रभावी छाप सहकार क्षेत्रातल्या अर्थविश्वात उमटवली आहे. अर्थकारणात विश्वासार्ह आणि सातत्याने वृद्धिंगत होणारी व्यवस्था म्हणून स्वरूपानंद पतसंस्थेने जनमानसात आपले स्थान अग्रेसर ठेवले आहे.
३०० सभासदांपासून ५० हजार सभासदांपर्यंतचा सर्वसमावेशक प्रवास
३०० सभासदांपासून प्रारंभ करत आज पतसंस्थेच्या सभासदांची संख्या ५० हजार झाली आहे. ५० हजार सभासदांच्या विश्वासाने ,५० हजार सभासदांच्या सहभागाने, सहयोगाने हे अर्थविश्व गुंफले गेले आहे. ५० हजार सभासदांना आर्थिक सेवा देत शहरापासून ग्रामीण भागापर्यंत आपला कार्यविस्तार करत ७६० कोटींचा संमिश्र व्यवसाय स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने केला आहे. आपल्या १७ शाखांच्या माध्यमातून प्रत्येक सन्माननीय ग्राहक सभासदाला विश्वासार्ह आणि अचूक आर्थिक सेवा देण्याचा यशस्वी, उपयुक्त कित्ता स्वरूपानंद पतसंस्थेने गिरवला आहे असे ॲड.दीपक पटवर्धन म्हणाले.
तालुका ते राज्य कार्यक्षेत्रापर्यंत स्वरूपानंद चा कार्यविस्तार
तालुका कार्यक्षेत्र, जिल्हा कार्यक्षेत्र, राज्य कार्यक्षेत्र पादाक्रांत करत स्वरूपानंदने अर्थकारण व्यापक बनवतानाच भागधारक सभासदांचा विश्वास जिंकत ५० हजार सभासदांचे स्वरुप अर्थ कुटुंब साकारले आहे असे ॲड.दीपक पटवर्धन म्हणाले.
५० हजार सभासदांचा एकजिनसी समूह
कोणत्याही आर्थिक संस्थेला आणि संस्थेच्या सभासदाला अभिमान वाटावा अश्या ५० हजार सभासदांच्या सदिच्छा, स्नेह, विश्वास आणि सहभागीदारी याच्या अमोघ संगमातून स्वरूपानंद पतसंस्था आपले अर्थकारण अधिक मजबूत करत आहे.
सभासदांची आर्थिक उन्नती आणि आत्मसन्मान
आर्थिक निकष आकडेवारी प्रमाणबद्धता कायम राखताना ५० हजार सभासदांचा आत्मसन्मान वाढावा, आर्थिक उन्नती व्हावी, सामाजिक बांधिलकी जपावी, नवयुवकांनाही उचित सहभाग प्राप्त व्हावा यासाठी स्वरूपानंद पतसंस्था सातत्याने प्रयत्न करत आहे आणि हे प्रयत्न कमालीचे यशस्वी होत आहेत आणि त्यामुळेच ५० हजार सभासदांचा एकजिनसी समूह आणि त्याची एकजिनसी आर्थिक ताकद बनून स्वरूपानंद पतसंस्था सहकार जगतात मान्यता प्राप्त करत आहे असे भावोद्गार ॲड.दीपक पटवर्धन अध्यक्ष स्वामी स्वरूपानंद पतसंस्था यांनी काढले.


