रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची श्री मनाचे श्लोक, भगवद्गीता पठण स्पर्धा

रत्नागिरी दि. २१ सप्टेंबर : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध प्रशालांमधील विद्यार्थ्यांसाठी श्री मनाचे श्लोक व श्रीमद्भगवद्गीता पंधरावा अध्याय पठण स्पर्धा सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात झाली. स्पर्धांचे सर्व नियोजन जांभेकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संजना तारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियोजित पद्धतीने केले.
विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, अध्यात्मिक विचार व संस्कृत वाङ्मयाबद्दल आवड निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती, उच्चारशुद्धता, आत्मविश्वास व वक्तृत्वकलेला वाव मिळावा, या उद्देशाने या पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. निशिगंधा पोंक्षे, नेत्रा काटदरे, सौ. माया तांबे व ऋतुजा माईनकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विद्यार्थ्यांच्या उच्चारशुद्धता, स्मरणशक्ती, सादरीकरण, भावपूर्ण पठण व आत्मविश्वास या विविध निकषांच्या आधारे परीक्षकांनी स्पर्धेचे परीक्षण केले. सूत्रसंचालन सचिन साठे यांनी केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- लहान गट – श्री मनाचे श्लोक- प्रथम : आर्या काटदरे (जीजीपीएस), द्वितीय विभागून : किमया साखळकर (रा. भा. शिर्के प्रशाला), नमिता सागवेकर (सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय), तृतीय विभागून : वैष्णवी प्रभूदेसाई (रा. भा. शिर्के प्रशाला), विहान परांजपे (बाबुराव जोशी गुरुकुल, जीजीपीएस). उत्तेजनार्थ : उर्वी कळंबटे (ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुल), सौम्या आठल्ये (जीजीपीएस). मोठा गट – श्रीमद्भगवद्गीता पंधरावा अध्याय- प्रथम- श्रेया भातडे (सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय), द्वितीय क्रमांक विभागून : ज्ञानदा नातू (जीजीपीएस), श्रावणी केळकर (एस. वाय. गोडबोले विद्यामंदिर, केळ्ये), तृतीय क्रमांक विभागून : अवनीश वझे (नानल गुरुकुल), गार्गी केळकर (एस. वाय. गोडबोले विद्यामंदिर, केळ्ये), उत्तेजनार्थ : अर्णव जोशी (जीजीपीएस) पूर्वा पवार (एस. वाय. गोडबोले विद्यामंदिर, केळ्ये).


