रत्नागिरी

रानगव्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या स्वप्नील पेडामकरच्या कुटुंबाला वनविभागातर्फे मदत सुपूर्द

देवरुख दि. २३ सप्टेंबर (सुरेश सप्रे) :-  देवरुख-रत्नागिरी मार्गांवरील आंबव येथे रानगव्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले साडवली येथील तरुण स्वप्नील पेडामकर यांचे उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले होते. या अत्यंत दुःखद घटनेनंतर वनविभागाने तत्परता दाखवत पीडित पेडामकर कुटुंबाला दहा लाख रुपयांचा शासकीय आर्थिक मदतीचा धनादेश आज त्यांच्या आईकडे सुपूर्द केला.

या शासकीय मदतीसाठी रत्नागिरी-चिपळूणच्या विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मदतनिधी त्वरीत वितरित करण्यात यावा यासाठी प्रयत्न केले .

या दुर्दैवी घटनेनंतर पीडित कुटुंबाला लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आमदार किरण सामंत व आमदार शेखर निकम या लोकप्रतिनिधी सह स्थानिक ‘सह्याद्री नगर मित्रमंडळा’ने विशेष पाठपुरावा केला होता.

‘सह्याद्री नगर मित्रमंडळा’नेअत्यंत संवेदनशील पाऊल उचलत आपला पारंपरिक दहीहंडी उत्सव रद्द करत दहीहंडीचा जमा झालेला संपूर्ण निधी स्वप्नीलच्या उपचारासाठी देण्यात आला होता; मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान स्वप्नीलची प्राणज्योत मालवली.

शासकीय अधिकारी व मान्यवरांची उपस्थितीत दहा लाख मदतीचा धनादेश सुपूर्द करताना वनविभाग व स्थानिक

वनविभाग अधिकारी: परिक्षेत्र वन अधिकारी (रत्नागिरी) विक्रम गुरव, संगमेश्वर-देवरुखचे वनपाल सागर गोसावी,सर्व वनरक्षक सुरेश उर्फ बारक्याशेठ बने, पप्पू नाखरेकर, संजय लाड, बंधू सुर्वे, सचिन मांगले, प्रमोद सुर्वे, निलेश भुवड, भाई चव्हाण, विशाल भानुशाली. अनूराग आखाडे यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

वनविभागाने वेळेत दिलेल्या या मदतीमुळे पेडामकर कुटुंबाला थोडा आधार मिळाला असला, तरी स्वप्नीलच्या जाण्याने साडवली व देवरुख परिसरात अजूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button