रत्नागिरी

निवळी जयगड महामार्गावर तरवळ येथे पडलेल्या धोकादायक खड्ड्यांमुळे मोठा अपघाताची शक्यता

तरवळ दि. ८ (अमित जाधव) :- रत्नागिरी तालुक्यातील निवळी जयगड महामार्गावर तरवळ येथील खेडेकर यांच्या घरासमोर पडलेल्या मोठ्या धोकादायक खड्ड्यांमुळे वाहतूकिचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून तेथे एका मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून रस्त्यांची अवस्था मोठया प्रमाणात दयनीय झाली आहे. निवळी ते जयगड या मार्गावर अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या पडलेल्या धोकादायक खड्ड्यांचे चित्र दिसून येतेय. त्यामध्ये तरवळ या ठिकाणी श्री खेडेकर यांच्या घरासमोर कायमच दरवर्षी मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असतात, या महामार्गावरून दररोज शेकडो अवजड वाहने वाहने ये जा करीत असतात. त्यामुळे वाहन चालकांना तसेच प्रवाशांना त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सुद्धा आपला जीव मुठीत धरून रहावे लागत आहे, कारण केव्हा अपघात होईल हे सांगता येत नाही, अशी अवस्था सध्या या ठिकाणी निर्माण झाली आहे. दरवर्षी या ठिकाणी पाऊस सुरू झाला की मोठ मोठे खड्डे पडतात, प्रशासनाच्या वतीने त्यावर तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी केली जाते, पण प्रत्येक पावसात तीच अवस्था निर्माण होत असते, कोणत्याही प्रकारचे ठोस उपाय या ठिकाणी केले जात नाहीत आणि त्यामुळे प्रत्येक वर्षी ही बोंब सुरू असते.

या ठिकाणी एवढे मोठे खड्डे पडले आहेत की वाहन चालकांना कसरत करून या ठिकाणाहून प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी एखादा मोठा अपघात घडण्याची मोठी शक्यता आहे. कारण रात्रीच्या वेळी या ठिकाणी पडलेले खड्डे लगेच लक्षात येत नाहीत आणि त्यामुळे वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नाही तिथेच मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण होऊ शकते.

त्यामुळे प्रशासनाने यावर वेळीच उपाययोजना करावी जेणे करून होणारा मोठा अपघात टाळला जाऊ शकतो. प्रत्येक वेळी एखादा अपघात घडल्यावरच प्रशासन जागे होणार आहे का? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

त्यामुळे या ठिकाणी कायम स्वरूपाची उपाय योजना करून दरवर्षी हे जे खड्डे पडतात त्यावर तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी न करता कायमचा बंदोबस्त करावा म्हणजे या ठिकाणी काँक्रिट स्वरूपातील ठोस असा रस्ता करावा जेणे करून पुन्हा ही समस्या उद्भवणार नाही अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांची येथील प्रवाशांची व स्थानिक नागरिक तसेच ग्रामस्थांची मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button