रत्नागिरी

२ ऑक्टोबर रोजी कळझोंडी ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा

विल्ये दि. २९ सप्टेंबर (अमित कांबळे) :- रत्नागिरी तालुक्यातील मौजे कळझोंडी ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:३० (साडेदहा) वाजता ग्रामपंचायत कार्यालय कळझोंडी येथील भव्य सभागृहात आयोजित करण्यात आली आहे .तरी गावातील मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामविकास अधिकारी अमोल केदारी व प्रशासकीय अधिकारी पी. एन. सुर्वे यांनी केले आहे.

सभेपुढील विषय पुढीलप्रमाणे :-

१) गावातील शाळांतील विद्यार्थी पटनोंदणी व उपस्थितीबाबत आढावा घेणे.

२) शाळेतील मुलभूत सुविधांचा आढावा घेणे.

३) भौतिक व मानवी सुविधांबाबत चर्चा करणे.

४) विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर चर्चा करणे.

५)शाळा व्यवस्थापन व इतर बाबींवर चर्चा करणे.

६)सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती व चर्चा करणे.

७) स्वच्छता ही सेवा (SHS)२०२६ अभियानाबाबत , स्वच्छ भारत दिवसानिमित्त विशेष उपक्रम राबविणे.

अशा अत्यंत महत्त्वाचे विषयांवर मार्गदर्शन, चर्चा व निर्णय घेण्यात येणार आहे.तरी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कळझोंडी ग्रामपंचायतीचे प्रशासक मा.पी.एन.सुर्वे, ग्राम विकास अधिकारी अमोल केदारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button