रत्नागिरी

१ ऑक्टोबरपासून रत्नागिरी येथे सम्राट अशोक कालीन धम्म लिपी व सात वाहन धम्म लिपी ऑनलाईन कोर्ससाठी प्रवेश सुरु

विल्ये दि. २८ सप्टेंबर (अमित कांबळे) :- भारतातील बौद्ध संस्कृती ही सम्राट अशोकाच्या काळात डोंगर,द-या कपारीत कोरलेल्या दगडात लेणी मध्ये वसलेली आहे. तेथे शिल्प,शिलालेख,स्तूप, विहार, चैत्यगृह आहेत. तेथील शिलालेख ज्या लिपीत कोरलेले आहेत, ती लिपी म्हणजे धम्म लिपी होय.हा बौध्द संस्कृतीचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे. ही धम्म लिपी शिकणे खूपच गरजेचं आणि महत्वाचे आहे.धम्म लिपीचे प्रशिक्षण घेवून आपण ती भाषा समजून घेतो तेव्हा आपण नक्कीच तिच्या प्रेमात पडतो.धम्म लिपी किती प्राचीन आहे आणि त्या लिपीपासून इतर अनेक लिपींची निर्मिती कशी झाली, याची विशेष माहिती या कोर्स मध्ये करुन दिली जाईल.

सम्राट अशोकांनी तिसऱ्या शतकात ह्या लेण्या व्यापारी मार्गावर कोरलेल्या आहेत.धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी धम्म लिपीचा वापर केला आहे.पर्यटन गाईड म्हणून वापर केला जातो.आपण जेव्हा वेरूळ,अजिंठा या ठिकाणी जातो तेव्हा गाईड आपल्याला अनेकदा अर्धवट व चुकीची माहिती देतात.आपल्याला आपला प्राचीन भारताचा खरा इतिहास समजून घ्यायचा असेल तर आपल्याला शिलालेखाचे वाचन करता आले पाहिजे.

यासाठी सम्राट अशोक कालीन धम्म लिपी हा कोर्स पंधरा दिवसाचा आहे. ज्यांना प्रशिक्षण घ्यायचे आहे, त्यांनी या कोर्स ला प्रवेश घ्यावा. ही धम्म लिपी शिकण्यासाठी वयाचे बंधन नाही.पंधरा दिवस सम्राट अशोक कालीन धम्मलिपी व पंधरा दिवस सातवाहन धम्मलिपी शिकवली जाणार आहे.विशेष म्हणजे हा कोर्स ऑनलाईन पद्धतीने दिनांक 1 ऑक्टो. ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत. संध्याकाळी वेळ 7 ते 8 या वेळेत घेतला जाणार आहे.या अभ्यासक्रमा करिता कोणतीही फी नाही, पूर्णपणे मोफत आहे.मात्र प्रवेश फी 200/- ₹ आहे.प्रवेश घेण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन प्रशिक्षकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

संपर्क प्रमुख प्रशिक्षक

प्रा.दिलीप वामनराव वासनिक.

पाली भाषा व धम्म लिपी अभ्यासक.

MA PALI (NET)उत्तीर्ण.

Phd.qualify

Mb. 9422469477.

तसेच केंद्रीय शिक्षक आयु.विजय यशवंत जाधव.(भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी)

पाली व धम्म लिपी अभ्यासक – 9422629622.

यांच्याशी संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button