क्रीडारत्नागिरी

शालेय कबड्डी स्पर्धेत आठल्ये-सप्रे पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाला विजेतेपद, तर मुली उपविजेत्या

देवरुख दि. २८ सप्टेंबर :- शिवाजी माध्यमिक विद्यालय, कोसुंब येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे (१९वर्षाखालील गटात) देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये- सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने विजेतेपद, तर मुलींच्या संघाने उपविजेतेपद प्राप्त केले

या स्पर्धेमध्ये मुलांच्या संघाने पहिल्या सामन्यात भाईशा घोसाळकर कनिष्ठ महाविद्यालय, कडवईचा, तर दुसऱ्या सामन्यात पैसाफंड कनिष्ठ महाविद्यालय, संगमेश्वरचा सहज पराभव केला. अंतिम सामन्यात महाविद्यालयाच्या संघाने दादासाहेब सरफरे कनिष्ठ महाविद्यालय, बुरंबी संघावर मात करत विजेतेपदाचा सन्मान प्राप्त केला. या शानदार कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या संघाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या मुलांच्या संघातील उत्कर्ष रावणंग व सर्वेश भेरे यांनी तर, मुलींच्या संघातील शामल पातेरे यांनी चमकदार खेळ केला.

महाविद्यालयाच्या संघांना क्रीडा प्रशिक्षक संजय इंदुलकर यांचे मार्गदर्शन लाभले. व्यवस्थापिका म्हणून प्रा. देवयानी जोशी यांनी काम पाहीले. दोन्ही संघाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, सुजाता प्रभूदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button