रत्नागिरी

देवरुखमध्ये ३० सप्टेंबरला नितीन बानगुडे पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान

देवरुख दि. २८ सप्टेंबर : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या रत्नागिरी विभाग व संगमेश्वर (देवरुख) तालुका यांच्या वतीने बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता देवरुख येथील माटे-भोजने हॉल, कॉलेज रोड येथे प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते, लेखक व इतिहास अभ्यासक प्रा. श्री. नितीन संपतराव बानगुडे पाटील यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

“कोकणचा सर्वांगीण विकास हाच जिजाऊचा ध्यास” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमातून कोकणातील शिक्षण, सामाजिक विकास, युवकांसाठी मार्गदर्शन तसेच स्पर्धात्मक परीक्षांच्या दृष्टीने प्रेरणादायी विचार मांडले जाणार आहेत.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था २००८ पासून कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार, स्पर्धा परीक्षा व महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन तसेच विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. संस्थेच्या माहितीनुसार, कोकणातील पाचही जिल्ह्यांत ४८ स्पर्धा परीक्षा वाचनालये व अभ्यासिका, ३८ पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे कार्यरत आहेत.

या उपक्रमास संस्थेचे संस्थापक श्री. निलेश भगवान सांबरे यांचे मार्गदर्शन लाभत असून, देवरुख नगरीत प्रथमच प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रेरणादायी व्याख्यानाचा लाभ विद्यार्थी, युवक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button