रत्नागिरी

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वी प्रवेशोत्सव उत्साहात

रत्नागिरी दि. १८ जुलै : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान मंगेश बापुजी तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी येथे इयत्ता ११ वीच्या नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव रंजन मंदिर येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिषा शिंदे यांनी केले, तर प्रास्ताविक विभागप्रमुख दीप्ती पंडित यांनी केले. कार्यक्रमास शालेय समितीचे अध्यक्ष मनोज पाटणकर, मुख्याध्यापक के. डी. कांबळे व उपमुख्याध्यापिका पूनम पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शिस्त, नियम, वेळेचे महत्त्व, वेशभूषा, नियमित अभ्यास व उज्ज्वल भवितव्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले तसेच नवागत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी कॉलेजच्या प्रगतीचा आढावा घेणारी पीपीटी दाखवण्यात आली. कॉलेजला दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्वानी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button