रत्नागिरी

कोमसापच्या १८ व्या केंद्रीय साहित्य संमेलन कार्यालयाचे रत्नागिरीत उद्घाटन

रत्नागिरी दि. २४ सप्टेंबर : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या १८ व्या केंद्रीय साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरातील साईरत्न कॉम्प्लेक्समध्ये २६ सप्टेंबर २०२६ रोजी शनिवारी सकाळी साडेदहा वाजता उद्घाटन होणार आहे. राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय स्वरुपा रवींद्र सामंत यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेचे १८ वे केंद्रीय साहित्य संमेलन येत्या २७, २८ आणि २९ नोव्हेंबर २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक संकुल येथे पार पडणार आहे. या संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी कोमसापचे सल्लागार आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर

आणि केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांच्या प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या उद्घाटन सोहळ्याला साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन १८ व्या केंद्रीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये आणि कार्यवाह गजानन पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button