खेडशी चांदसूर्या जवळ जखमी अवस्थेत आढळला बिबट्या

रत्नागिरी दि. २८ नोव्हेंबर :- तालुक्यातील खेडशी चांदसूर्या, मलुष्टे यांच्या आंबाबागेसमोरील रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरती वन्यप्राणी बिबट जखमी अवस्थेत दिसून आल्याचे श्री. निरंजन जठार राहणार हातखंबा यांनी फोनद्वारे कळविले असता सदरची माहिती वरिष्ठांना देऊन तात्काळ स्टाफसह रेस्क्यू साहित्य घेऊन जागेवर जाऊन पाहणी करता सदरचा वन्यप्राणी बिबट जखमी अवस्थेत असल्याचे दिसून आले.
सदरचा वन्यप्राणी हा काही वेळाने लंगडत, अडखळत असा पुढे जात असल्याने सदर वन्यप्राणी बिबट याला रेस्क्यू करणे धोकादायक असल्याने वरिष्ठांचा सल्ला घेऊन पशु वैद्यकीय अधिकारी रत्नागिरी यांच्या सहकार्याने डाट गनच्या सहाय्याने सदर वन्यप्राणी बिबट याला बेशुद्ध करून पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करण्यात आले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी रत्नागिरी यांचे कडून प्राथमिक तपासणी करून सदर वन्य प्राण्याला पुढील आवश्यक त्या उपचाराकरिता रेस्क्यू सेंटर पुणे येथे पाठविण्यात आले.
सदर रेस्क्यू वेळी श्री.विक्रम गुरव परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी, श्री स्वरूप काळे. पशुवैद्यकीय अधिकारी रत्नागिरी, श्री सागर गोसावी वनपाल देवरुख,श्री रत्नराज गायकवाड वनपाल पाली , श्री सहयोग कराडे वनरक्षक साखरपा,श्री आकाश कडूकर वनरक्षक फुणगुस, श्रीमती शर्वरी कदम वनरक्षक जाकादेवी श्री विराज संसारे वनरक्षक रत्नागिरी, श्री महेश धोत्रे श्री.ईशान खानोलकर (RRT)असे सर्वजण उपस्थित होते.
सदरची कार्यवाही श्रीमती गिरीजा देसाई, विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण. श्रीमती प्रियंका लगड सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अशी कोणतीही घटना घडल्यास वनविभागाच्या 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


