कळझोंडी ग्रामपंचायत येथे संविधान दिन उत्साहात साजरा

विल्ये दि. २८ नोव्हेंबर (अमित कांबळे) :- रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी ग्रामपंचायत कार्यालय येथे “भारतीय संविधान सन्मान दिन” माजी उपसरपंच – प्रकाश रामचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख मार्गदर्शक ग्रामविकास अधिकारी अमोलजी केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.

यावेळी विचार मंचावर माजी उपसरपंच- प्रकाश पवार ग्रामविकास अधिकारी अमोलजी केदारी, माजी केंद्रप्रमुख -अनिल पवार गुरुजी ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदीप पवार, ग्रामपंचायत माजी सदस्य सहदेव वीर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर व संविधान उद्देशिका यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ग्राम विकास अधिकारी यांनी उद्देशिकेचे वाचन केले.त्यानंतर भारतीय संविधान, त्यातील मुलभूत कर्तव्ये, अधिकार व राष्ट्रीय एकता आणि एकात्मता या विषयी सामाजिक कार्यकर्ते किशोर पवार यांनी मौलिक विचार व्यक्त केले.
त्याच बरोबर महिला मंडळाच्या जेष्ठ कार्यकर्त्या व माजी ग्रामपंचायत सदस्या नम्रता पवार, माजी सदस्य सहदेव वीर, कळझोंडी बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष आयु.अनिल पवार,ग्राम विकास अधिकारी अमोलजी केदारी व माजी उपसरपंच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी भारतीय संविधान दिनाचे महत्त्व अतिशय अभ्यासपूर्ण मनोगतातून व्यक्त केले.या कार्यक्रमाला आशा सेविका – साक्षी पवार, पोस्ट मास्तर – रविंद्र वीर, तंटामुक्त समितीचे माजी – अध्यक्ष महादेव आग्रे, पांडुरंग वीर, वैभव शिंदे,सुभाष पवार,संगम पवार, सुशांत पवार, सावित्रीबाई फुले आदर्श महिला मंडळ उपाध्यक्ष संपदा पवार, सहसचिव करुणा पवार, सल्लागार मयुरी पवार, ज्योती जाधव, ग्राम पंचायत कर्मचारी भिमराज पवार,अस्मी वीर आदी मान्यवर ग्रामस्थ बंधू भगिनी उपस्थित होत्या.
प्रारंभी स्वागत,कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार – ग्राम विकास अधिकारी अमोल केदारी यांनी मानले.



