रत्नागिरी

‘सृजन सायन्स सेंटर, देवरुख’ आयोजित ‘वसुंधरा ऑलिंपियाड २०२६’ ला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

देवरुख दि. २५ नोव्हेंबर ( प्रतिनिधी ):- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटरने देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त सुरू केलेल्या पहिल्या वार्षिक जिल्हास्तरीय “वसुंधरा ऑलिंपियाड: २०२६” स्पर्धेला विद्यार्थ्यांचा लाभलेल्या उस्फुर्त सहभागाने स्पर्धा उत्साहपूरक वातावरणात संपन्न झाली. जिल्हा परिषद आदर्श शाळा, पूर प्रशालेला सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या सहभागाबद्दल ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट पोस्टर मेकिंगकरिता पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल, देवरुखच्या कुमारी दिया गणेश खामकर हिला गौरविण्यात आले. या जिल्हास्तरीय स्पर्धेला सुमारे १५० स्पर्धकांचा सहभाग लाभला होता.

वसुंधरा प्रश्नमंजुषा स्पर्धेतील गटवार विजेते खालील प्रमाणे:- गट क्र.१(इ.४थी व ५वी)-

प्रथम- अर्जुन पंडित(पाध्ये स्कूल), द्वितीय- स्वरूप साळवी(डीव्हीएम, लांजा), तृतीय- अर्णव कुलकर्णी(पाध्ये स्कूल).गट क्र.२(इ.६वी ते ८वी)-

प्रथम- अर्णव शिंदे(पीएस बने स्कूल), द्वितीय- आयुष चव्हाण(पाध्ये स्कूल), तृतीय- आर्या खेतल(पाध्ये स्कूल). गट क्र. ३(इ. ९वी व १०वी)- प्रथम- प्रसाद जाधव(देवरुख हायस्कूल), द्वितीय- शाल्मली वाघमारे(पाध्ये स्कूल), तृतीय- सिद्धी पाटील(ठाकरे हायस्कूल).गट क्र. ४(इ. ११वी व १२वी)- प्रथम- वेदा आंबवकर(एएसपी ज्युनियर कॉलेज, देवरुख), द्वितीय- मृणाल कांबळे(निवे ज्युनिअर सायन्स कॉलेज), तृतीय- यश महाडिक(सप्रे ज्युनियर सायन्स कॉलेज).

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संस्थाध्यक्ष सदानंद भागवत व सृजन विज्ञान केंद्र संचालक डॉ. चंद्रशेखर केदारी, प्रा. धनंजय दळवी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. संस्थाध्यक्ष श्री. भागवत यांनी विज्ञान केंद्रात उपलब्ध असणाऱ्या विविध उपकरणे सुविधा, भविष्यामध्ये येणारी अत्याधुनिक उपकरणे व उपलब्ध होणाऱ्या प्रयोगशाळा यांचा विद्यार्थी कशाप्रकारे वापर करू शकतात याची सविस्तर माहिती दिली. स्पर्धा संयोजक डॉ. चंद्रशेखर केदारी यांनी स्पर्धा घेण्यामागील उद्देश व त्याचे वैश्विक महत्व स्पष्ट केले. तसेच ही स्पर्धा दरवर्षी घेण्यात येईल, असे सूचित केले. ह्या केंद्रामध्ये नियमितपणे आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांबाबत व इतर उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. सर्वसाधारण विजेतेपदाच्या सन्मानासाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी जि. प. आदर्श शाळा, पुरचे शिक्षक राजेश सावंत व विद्यार्थ्यांना आकर्षक चषक, प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन गौरविले. प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना वैयक्तिक पारितोषिक स्वरूपात रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक व मेडल देऊन गौरविण्यात आले.

“वसुंधरा ऑलंपियाड:२०२६” स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांसोबत शिक्षक मार्गदर्शक व पालकांची बहुसंख्येने उपस्थिती होती. या स्पर्धेच्या नीटनेटक्या व यशस्वी आयोजनासाठी विज्ञान केंद्र संचालक डॉ. चंद्रशेखर केदारी यांच्या नियोजन व मार्गदर्शनाखाली केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या आर्मी व नेव्ही एनसीसी युनिटमधील कॅडेट्सनी ह्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन स्पर्धा सुरळीत पार पाडली. या स्पर्धेला संस्था उपाध्यक्षा नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, सीईओ नितीन शेडगे, सुजाता प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी शुभेच्छा देऊन, सहभागी व यशस्वी स्पर्धक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button